सी के टी शाळेस ‘ आदर्श शाळा ‘ पुरस्कार 

   पनवेल महानगरपालिका शिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने (दि २४) रोजी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे आयोजित शैक्षणिक कार्यशाळा (चला शिक्षणावर बोलू काही.…) विद्यार्थी शैक्षणिक प्रवास दिनदर्शिका २०२५- २६ उद्घाटन सोहळा, आदर्श शिक्षक पुरस्कार व आदर्श शाळा पुरस्कार सोहळा २०२५ संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्यात पनवेल तालुक्यातील काही निवडक शाळांना पुरस्कार देण्यात आले त्यात नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास  ‘ आदर्श शाळा ‘ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

शाळेचे मुख्याध्यापक कैलास सत्रे व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य प्रशांत मोरे यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला.