सेवापुर्ती आणि सेवागौरव समारंभ

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक श्री. विवेक नारायण पाटील यांच्या प्रदीर्घ व समर्पित सेवेसाठी संस्थेत होणारी सेवापुर्ती आणि सेवागौरव समारंभ आयोजित करून गौरव करण्यात आला. संस्थेचे चेअरमन लोकनेते माननीय श्री.रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गेली २६ वर्षे शिक्षक म्हणून चांगू काना ठाकूर विद्यालयात ज्ञानदानाचे काम करणाऱ्या श्री. विवेक पाटील सर यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी  या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या उत्कृष्ट व निष्ठावान सेवेसाठी संस्थेच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या गौरव सोहळ्यात,  लोकनेते श्री.रामशेठ ठाकूर साहेब यांनी श्री.विवेक पाटील सर यांचा शाल, श्रीफळ आणि मानपत्र देऊन यथोचित सन्मान केला.चांगू काना ठाकूर उच्च माध्यमिक विभागातर्फे त्यांच्या पत्नी सौ.सुहास विवेक पाटील आणि त्यांच्या मातोश्री यांचाही गौरव करण्यात आला.

या गौरव सोहळ्यात बोलताना, रामशेठ ठाकूर साहेबांनी श्री. विवेक पाटील सर यांच्या कार्याची प्रशंसा केली. ते म्हणाले “श्री. विवेक पाटील यांनी आपल्या सेवेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जीवनात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांची कामा प्रती असलेली निष्ठा आणि समर्पण भाव निश्चितच अनुकरणीय आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ शिकवले च नाही तर त्यांच्यावर संस्कार ही केले.” त्यांनी विवेक पाटील सर यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी संस्थेचे उपकार्यध्यक्ष माननीय श्री. वाय. टी.देशमुख सर, संस्थेचे सचिव डॉ. एस.टी. गडदे सर, सत्कारमूर्ती श्री. विवेक पाटील सर,त्यांच्या पत्नी सौ. सुहास विवेक पाटील मॅडम आणि त्यांच्या मातोश्री यांनी विशेष उपस्थिती दर्शवली.

सेवापुर्ती सोहळ्यात उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य श्री.प्रशांत मोरे सर यांनी आपले प्रास्ताविक सादर करताना मागील २६  वर्षात पाटील सरांनी केलेल्या उत्कृष्ट कामांचा उल्लेख केला. त्यांची कामाबद्दल असलेली निष्ठा, त्यांचा समर्पण भाव आणि एक उत्तम सहकारी ,त्यांना मिळालेला आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांच्या अशा अनेक गुणांचा उल्लेख केला.

           मराठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. कैलास सत्रे सर, इंग्रजी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.संतोष चव्हाण सर,  इंग्रजी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.नीलिमा शिंदे मॅडम , मराठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.सुभाष मानकर सर, पर्यवेक्षक श्री. के.के. म्हात्रे सर, पर्यवेक्षिका सौ.वैशाली पारधी मॅडम, पर्यवेक्षिका सौ.निरजा अधूरी मॅडम, पर्यवेक्षक श्री.अजित सोनवणे सर, पर्यवेक्षिका सौ. स्वाती पाटील मॅडम , माजी विद्यार्थी, सरांचा मित्रपरिवार, शिक्षक व शिक्षकेतर  कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून सरांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

           विवेक पाटील सर यांनी आपले विचार व्यक्त करताना आपल्या 

  मागील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले,सहकाऱ्यांकडून मला माझ्या प्रत्येक कामात साथ मिळाली म्हणूनच मी माझी जबाबदारी पूर्ण करू शकलो.

            उच्च माध्यमिक विभागाच्या सहशिक्षिका सौ.मेबल मॅडम यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांतर्फे श्री.विवेक पाटील सर यांचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागातर्फे करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सहशिक्षक श्री. राजेंद्र गांगरे सर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.